राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश “कार्यकारणी सदस्य “पदी इंदापूर च्या ‘अमोल भिसे ‘यांची निवड!nn
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ”कार्यकारणी सदस्य “पदी अमोल हरिदास भिसे यांची निवड करण्यात आली आहे.nnमहाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी च्या राज्यस्तरीय सभेत हा निर्णय घेण्यात आला.nnमहाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस चे(शरद पवार गट )प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडीचे पत्र अमोल भिसे यांना दिले.nnअमोल भिसे यांनी यापूर्वी इंदापूर पंचायत समिती चे सदस्य, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य, पुणे जिल्हा परिषदेच्या ‘स्थायी समिती ‘चे सदस्य, पुणे जिल्हा शिक्षण समिती चे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.nnपुणे जिल्हा परिषदेतील आक्रमक व अभ्यासू चेहरा अशी त्यांची ओळख आहे.nnत्यांच्या या कामाची दखल घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनांखाली निवड झाली आहे.