Uncategorized

सहाय्य्क पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांचा ‘सत्कार ‘

सहाय्य्क पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांचा ‘सत्कार ‘nnnnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnरेडणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात इंदापूर पोलीस स्टेशनं अंतर्गत बावडा पोलीस स्टेशनला नव्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी रुजू झालेले दिपक जाधव यांचा सत्कार आणि सन्मान ग्रामपंचायत च्या सरपंच श्रीमती मीराबाई खाडे यांनी केला.nnयावेळी त्यांच्या समवेत उपस्थित असलेले फौजदार भरत जाधव यांचा सत्कार आणि सन्मान ग्रामपंचायत चे उपसरपंच प्रफुल्ल चव्हाण यांनी केला.nnतसेच बावडा पोलीस चौकी चे पोलीस नाईक कळसाईत यांचासन्मान ग्रामपंचायत सदस्य स्वाधीन खाडे यांनी केला.nnयावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन काळे, शहाजी तरंगे, सुभाष शिर्के, तसेच सदस्यां कोमल लोंढे, मुक्ताबाई काळाकुटे, पुष्पा काळकुटे, सविता सोनटक्के,लक्ष्मी तरंगे, पूनम हाके,तसेच तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष शैलेश तरंगे,ग्रामपंचायत कर्मचारी हरिदास काळे, अशोक मोहिते, रामचंद्र मोहिते उपस्थित होते.nnया कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन सचिन तरंगे यांनी तर आभार ग्रामविकास अधिकारी शिवाजी फुगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *