रावसाहेब घोरपडे सार्वजनिक वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदानnn
nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे विभागीय ग्रंथालय संघ, पुणे जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त अधिवेशनात रावसाहेब घोरपडे सार्वजनिक वाचनालयास आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
nnपुणे विभागीय ग्रंथालय संघ, पुणे जिल्हा ग्रंथालय संघ यांचे संयुक्त अधिवेशन दि.५ मार्च २०२३ रोजी सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात पार पाडले. या कार्यक्रमात इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथील रावसाहेब घोरपडे सार्वजनिक वाचनालयास पुणे विभागीय ग्रंथालय संघाकडून आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, पुणे विभागीय ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॅ.यशवंत पाटणे, मा.आमदार उल्हासदादा पवार, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयराव कोलते, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार यांचेकडून राजेंद्र घोरपडे यांनी स्विकारला.