Uncategorized

मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी विनोद दिलीप गोलांडे यांची नियुक्ती करण्यात आली.

nnबारामती – मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी बारामती तालुक्यातील सोमेश्वर-करंजे येथील विनोद दिलीप गोलांडे यांची पदावर नियुक्ती करण्यात आली.nnगोलांडे हे विविध सामाजिक संघटना तसेच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याने मानव अधिकार संरक्षण समिती मुख्य डॉ .भगवान भाई दाठीया यांच्या सूचनेनुसार जी.एम.भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने व पुणे जिल्हा युवा अध्यक्ष नागेश जाधव यांच्या शिफारशीवरून विनोद गोलांडे यांची पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातून विनोद गोलांडे यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *