नवमतदारांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन*nnपुणे दि.२३- जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींना या संधीचा लाभ घेता यावा म्हणून २५ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघाअंतर्गत महाविद्यालयांमध्ये नवतरुण मतदारांसाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.nnभारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार ९ नोव्हेंबर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ८ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीमध्ये मतदार यादीतील लक्षित गटांसाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. वयाची १८ वर्ष पुर्ण झालेल्या सर्व पात्र नवमतदारांना नोंदणीसाठी ८ डिसेंबरपूर्वी अर्ज क्र.६ भरता येणार आहे.nnयेत्या २५ नोव्हेंबर रोजी एकाच वेळी एकूण ४५० महाविद्यालयांमध्ये या शिबीराचे आयोजन करण्यातआले आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र युवा मतदारांनी या विशेष शिबीरांचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना अर्ज क्र.६ त्यांच्या महविद्यालयात विशेष शिबीरादरम्यान भरुन द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.
Related Posts
माती परीक्षण काळाची गरज! कृषी दुतांचे शेतकऱ्यांना आवाहन
माती परीक्षण काळाची गरज! कृषी दुतांचे शेतकऱ्यांना आवाहनnnnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnमहात्मा फुले कृषी विद्यापीठ…
मोठी कारवाई! मुंबईत युट्यूबरला अटक, ५० लाखांचा गांजा जप्त; बॉलिवूडपर्यंत धागेदोरे असल्याचा संशय
मोठी कारवाई! मुंबईत युट्यूबरला अटक, ५० लाखांचा गांजा जप्त; बॉलिवूडपर्यंत धागेदोरे असल्याचा संशयnnसंतोष भोसले, रेडा…
आबालवृद्धांच्या मनाचा काठ चिंब करणारं ‘थुई थुई आभाळ’!! साहित्यिक रवींद्र गुरव यांची माहिती
nnसचिन तरंगे (शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nn’थुई थुई आभाळ’ हा कविवर्य गोविंद पाटील यांचा बालकविता संग्रह…