Uncategorized

इंदापूरात “कृषि पदवीधारकांचा “मेळावा !- कृषि पदवीधर अमोल भिसे

इंदापूरात “कृषि पदवीधारकांचा “मेळावा !- कृषि पदवीधर अमोल भिसेnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कृषी पदवीधरकांच्या वतीने “इंदापूर तालुका कृषी पदवीधारकांचा स्नेहमेळावा 25ऑक्टोबर 2022रोजी आयोजित केला असल्याची माहिती, कृषी पदवीधारक अमोल भिसे यांनी दिली.nnइंदापूर तालुका कृषी पदवी धारकांच्या वतीने आयोजित जेष्ठ व कनिष्ठ कृषी पदवी धारकमध्ये सुसंवाद साधून कृषी व्यवसाय व कृषी पदवीधर धारकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी जेष्ठ पदवीधरकांचे मार्गदर्शन होणार आहे.nnतसेच इंदापूर तालुका कृषी पदवीधर संघटनेची कायदेशीर नोंदणी करीत असताना शेती व शेतकरी हित मजबूत करण्यासाठी कृषी पदवीधर च्या संवादतून धोरण निश्चित करणे यासाठी मेळावा आयोजित केला आहे.nnसदर चा मेळावा मंगळवार दिनांक 25 ऑक्टोबर 2022रोजी इंदापूर येथील राधिका रेसिडेन्सी क्लब येथे सकाळी 10 वाजता होणार असून अधिक माहिती साठी दूरध्वनी क्रमांक 9422525656,9420914648,9405802551यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *