Uncategorized

राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार”सुप्रिया गेनबा आगवणे”यांना जाहीर!

nnराज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार”सुप्रिया गेनबा आगवणे”यांना जाहीर!nn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnश्रीमती.सुप्रिया गेनबा आगवणे/कणसे ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेडणी (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) या ठिकाणी अकरा वर्षांपासून कार्यरत आहे. कर्तुत्ववान शिक्षक पुरस्कारासाठी कोरोना काळातील कार्य स्वयंसेवक स्मार्टफोन उपक्रम ह्या नावाने उपक्रमाचा प्रस्ताव सादर केलेला होता. सदर उपक्रम कोरोना काळापासून राबविला जात आहे. या उपक्रमामुळे महिला पालक गट सक्रिय होऊन शिक्षण प्रक्रियेमध्ये त्यांचे सहकार्य अधिकाधिक मिळू लागले.nआत्तापर्यंत जिल्हा परिषद पुणे यांचा विशेष उपक्रमशील शिक्षक पुरस्कार त्याचबरोबर इतर बारा सामाजिक संस्थांचे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत.nnराज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मनापासून खूप आनंद झाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.हा पुरस्कार पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारामुळे मनोबल वाढलेले असून नवनवीन उपक्रम राबविण्याचा मानस श्रीमती सुप्रिया आगवणे यांनी व्यक्त केला.nnशिक्षक ध्येय मासिकाच्या माध्यमातून उपक्रमशील शिक्षकांना एक नवीन भरारी मिळाली आहे. अनेक उपक्रमशील शिक्षकांच्या यशोगाथा या मासिकाच्या माध्यमातून वाचत आले, आणि आपणही काहीतरी नवीन करू शकतो ही प्रेरणा मिळाली. आपण पुरस्कार रुपी केलेला सन्मान नक्कीच माझ्यासाठी खूप अनमोल असा आहे, असे त्यांनी शिव-कल्याण शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *