Uncategorized

फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात – जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आवाहन

११ मे रोजी फेरफार अदालतीचे आयोजन ,n

    n

  • फेरफार अदालतीमध्ये उपस्थित राहून प्रलंबित नोंदी निर्गत करून घ्याव्यात – जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आवाहन
  • n

n( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे दि. ९ : आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड १९ बाबतच्या नियमांचे पालन करुन पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर ११ मे २०२२ रोजी फेरफार अदालत आयोजित केली जाणार आहे.nnफेरफार नोंदी प्रलंबित आहे अशा व्यक्तींनी ११ मे रोजी होणाऱ्या फेरफार अदालतीमध्ये संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित रहावे. यावेळी मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक ते कागदपत्र उपलब्ध करुन देऊन आपल्या नोंदी निर्गत करुन घ्याव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले आहे.nnलोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येवून जनतेच्या प्रलंबित साध्या, वारस, तक्रारी फेरफार नोंदी निर्गत करण्याच्या सूचना आहेत. पुणे जिल्ह्यात ९ मे २०२२ अखेर मुदत पूर्ण झालेल्या १४ हजार १३४ नोंदी प्रलंबित असून या नोंदीमध्ये प्रामुख्याने साध्या, वारस, तक्रार व मुदत पूर्ण झालेल्या सर्व प्रकारच्या नोंदी निर्गती करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.nnया अदालतीच्या दिवशी जास्तीत जास्त नोंदी निर्गत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. फेरफार अदालतीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर संपर्क अधिकारी नियुक्त केलेले असून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनादेखील काही फेरफार अदालतीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *