Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

धर्मादाय वकील संघटनेद्वारे सुनिता तरार यांचा स्वागत सोहळा

धर्मादाय वकील संघटनेद्वारे सुनिता तरार यांचा स्वागत सोहळाnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे येथील सह धर्मादाय आयुक्त कार्यालयातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्यावतीने नवनियुक्त अतिरिक्त सह धर्मादाय आयुक्त सुनिता तरार यांचे स्वागत करण्यात आले. सोमवारपासून तरार यांनी पदभार स्वीकारला असून दर महिन्याच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात त्या पुण्यातून कार्यभार सांभाळणार आहेत. कार्यालयातील वकील कक्षात हा स्वागत सोहळा संपन्न झाला.nमूळच्या नांदेड येथील विधी क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या सुनिता तरार या २०१२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेनुसार थेट सह धर्मादाय आयुक्त म्हणून नियुक्त झाल्या आहेत. सुरूवातीला कोल्हापूर व नंतर मुंबई येथील मुख्यालयात काम करत असताना त्यांना शासनाने पुण्यात अतिरिक्त कार्यभार दिला आहे.nआपल्या कार्यपद्धती बद्दल सांगताना तरार यांनी वक्तशीरपणा व जलद न्यायदान प्रक्रियेवर त्यांचा विशेष भर राहील असे सांगितले.nकार्यक्रमाला सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के, उपायुक्त राहूल मामू, सहाय्यक आयुक्त अमरदीप तिडके, राहूल चव्हाण, राणी मुक्कावार व प्रशांत चव्हाण उपस्थित होते.nॲड. दिलीप हांडे यांनी प्रास्ताविक केले तर ॲड. पराग एरंडे यांना संघटनेची माहिती दिली. कार्यकारिणी सदस्य ॲड. गायत्री पंडित यांनी तरार यांचा सत्कार केला तसेच ॲड. रोहिणी पवार यांनी सूत्रसंचलन केले. सचिव ॲड. सुनिल मोरे यांनी आभारप्रदर्शन केले.n———————————–nभौगोलिकदृष्ट्या पुणे विभाग हा सोलापूर, अहमदनगर, सातारा व पुणे या जिल्ह्यांचा मिळून असल्याने व सर्वात जास्त संस्था या विभागात नोंदणीकृत झाल्याने सह आयुक्तपदाचा कार्यभार खूप मोठा होता. अतिरिक्त सह आयुक्तांच्या नियुक्ती मुळे तरार या सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील कामे पहातील तर सुधीर बुक्के हे पुणे व सातारा जिल्ह्यांची तसेच सर्व न्यास मिळकतींची विक्री व कर्ज प्रकरणे पहातील. कामाच्या विभाजनामुळे न्यायदान प्रक्रिया जलद होऊन अंतिमतः पक्षकारांना त्याचा फायदा होईल.nॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदारnअध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *