Uncategorized

अन्यायकारक निलंबन रद्द करण्यासाठी उपोषण!

nnअन्यायकारक निलंबन रद्द करण्यासाठी उपोषण!nnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे जिल्हा परिषदे समोर दौंड तालुक्यातील मलठण क्रं 1 दे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक निलेश शिर्के यांचे ‘ बेकायदेशीर’ निलंबन रद्द करण्यासाठी व न्यायिक हक्कासाठी कुटुंबासह उपोषण करीत आहे,त्यांच्या पत्नी उपोषणास बसले आहेत.nत्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये माझे निलंबनचा आदेश म्हणजे दौंड पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभाराचे उदाहरण आहे,माझ्या विरोधात बोगस रेकॉर्ड तयार करून,व तसेच पदाचा गैरवापर करून खोट्या तक्रारी,अपूर्ण व बोगस अहवाल ,दुसऱ्या शाळेतील मुख्याध्यापक च्या विषयी असणारी तक्रार याच्या आधारे निलंबन करून बळीचा बकरा बनविल्या चा आरोप उपशिक्षक निलेश शिर्के व यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.nकेंद्र प्रमुख व गट शिक्षाधिकारी यांनी जाणीव पूर्वक व पूर्व ग्रह दूषित हेतूने गोपनीय अहवाल असमाधान कारक तयार केले आहेत.nnत्यांनी या निवेदनात अन्याय कारक निलंबन रद्द करावे, सदर कालावधी कर्तव्य कालावधी धरून सर्व लाभ द्यावेत,चुकीचे व बोगस रेकॉर्ड तयार करणारे शिक्षक संतोष पवार ,केंद्र प्रमुख श्रीमती नदा धावडे यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करावी,पदाचा गैरवापर करून चुकीचे काम करणारे शिक्षण विस्तार अधिकारी श्री हिंगणे यांचेवर कठोर कारवाही करावी,चुकीचे काम करणारे शिक्षक अधिकारी,यांना वाचविणारे तसेच बोगस रेकॉर्ड असविधनिक मार्गाने बदलण्यासाठी दबाव आणणारे व गट विकास अधिकारी यांची दिशाभूल करून निलंबन आदेशावर त्यांची सही घेणारे भ्रष्ट गट शिक्षण अधिकारी नवनाथ वणवे यांना निलंबित करून कठोर कारवाही करावी,बोगस चौकशी अहवाल तयार केलेल्या श्रीमती जराडे याची चौकशी करून कारवाई करावी.दौंड तालक्यातील रिक्त शाळेवर पुनर्स्थापित करावे अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.nnया सर्व मागण्यासाठी व न्याय मिळविण्यासाठी 27 सप्टेंबर पासून सह कुटुंब जिल्हा पुणे परिषद समोर उपोषण सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *