Uncategorized

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढील वर्षी होणार! गट व गण रचनेकडे राजकीय वर्तुळात चर्चा

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढील वर्षी होणार!nगट व गण रचनेकडे राजकीय वर्तुळात चर्चाnnसचिन तरंगेn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे जिल्ह्यातील पंचायत समित्या व जिल्हा परिषदेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे,यात प्रामुख्याने मार्च 2022 च्या दरम्यान निवडणुकांचा राजकीय संग्राम सुरू होणार आहे.nnपुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य यांच्याकरिता “गट”असतो तर पंचायत समिती साठी”गण”असतो,अशी साधारणतः निवडणूक असते.पुणे जिल्हा परिषदेत एकूण 75सदस्यnतर जिल्यातील सर्व पंचायत समितीचे मिळून एकूण 150गण आहेत,nमहत्वाचे म्हणजे मुळशी व हवेली तालुक्यातील एकूण 23 गावे राज्य सरकारने महापालिकेत समाविष्ट केली आहेत,त्यामुळे निवडणूक प्रशासनाने एकूण 4 जिल्हा परिषद सदस्यांचे पद रद्द केले आहेत,पण तरीही पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या ही कमी न होता ती 75 इतकीच राहणार आहे.nत्यामुळे प्रभाग रचना तयार करताना “प्रांताधिकारी”यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.गट आणि गणांची रचना तयार करण्याचे अधिकार ‘प्रांताधिकारी’ यांना आहेत.nnजिल्हा परिषद गटात कोणत्या गावाचा समावेश होतो, याकडे जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.nnपुणे जिल्ह्यातील गट व गण च्या रचनेस प्रांताधिकरी यांच्या मान्यतेनुसार ती रचना अंतिम करण्याचे अधिकार हे विभागीय आयुक्तांकडे राहणार आहेत.nnइंदापूर तालुक्यात 7 जिल्हा परिषद गट व सदस्य संख्या तर पंचायत समिती गण व सदस्य संख्या 14इतकी आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद गटाची व पंचायत समिती गणाची प्रभाग रचना आहे हीच अंतिम राहणार की त्यात फेररचना होणार याकडे ‘ राजकीय कार्यकर्ते व पदाधिकारी’ यांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *