Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284

Warning: ftp_mkdir() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 642

Warning: ftp_nlist() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 492

Warning: ftp_pwd() expects parameter 1 to be resource, null given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp/wp-admin/includes/class-wp-filesystem-ftpext.php on line 284
Uncategorized

काँग्रेसच्या” कॅबिनेट मंत्र्याने राष्ट्रवादीच्या “राज्यमंत्र्यास” इंदापूर च्या जागेवरून डिवचले! कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे इंदापुरात वक्तव्य..

“काँग्रेसच्या” कॅबिनेट मंत्र्याने राष्ट्रवादीच्या “राज्यमंत्र्यास” इंदापूर च्या जागेवरून डिवचले!nकॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे इंदापुरात वक्तव्य..nnसचिन तरंगे ( शिव-कल्याण न्यूज नेटवर्क )nnराज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना, कॉमन मिनिमन कार्यक्रमाचा”राजकीय तह”ठरला असताना काँग्रेसने पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.nnइंदापूरसहीत संपूर्ण राज्यात काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.nnभविष्यात इंदापूर विधानसभा मतदारसंघ कायम स्वरूपी राष्ट्रवादीकडे राहील अशी परिस्थिती आज असताना आघाडी सरकारमधील मंत्र्यांने इंदापूरची जागा आम्ही लढविणार, ती सोडणार नाही, असे वक्तव्य करून मंत्रिमंडळातील बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना इंदापूर येऊन थेट डिवचण्याचा प्रकार झाला आहे.nnसर्वात महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काही महिन्यांपूर्वी इंदापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडले होते. पटोले यांचं हे विधान ताजं असतानाच इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस शंभर टक्के लढवणारच. ही जागा कुणालाही सोडण्यात येणार नाही, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.हे विधान राष्ट्रवादीच्या चांगलच जिव्हारी लागले आहे.nnपुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील विधानसभेच्या जागेचा इतिहास संपूर्ण राज्याला माहीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची की काँग्रेसची यावर प्रचंड वादंग निर्माण झाले होते.nnइंदापूर ची विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला होता. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी निवडणुकीपूर्वीच तुटते की काय? असं चित्रं तेव्हा निर्माण झालं होतं. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यांच्या विरोधात तत्कालीन कॉंग्रेसचे नेते आणि आता भाजपात असणारे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे भरणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमध्ये २० वर्षे राहून अनेक मंत्री पद भूषवली होती. ते काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसच्या अनेक मोठ्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असायचा. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाचाला कंटाळून काँग्रेस सोडत आहे, असा आरोप करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील भाजप उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे होते. या अटीतटीच्या लढतीत भरणे यांचा अवघ्या ३३१० मतानी विजय झाला होता. पुन्हा एकदा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता.nnएकच मंत्रिमंडळातील कॅबिनेट व राज्यमंत्री आमने सामने-nnएकाच मंत्रिमंडळात काम करत असताना काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे कट्टर कार्यकर्ते तथा राज्याचे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना उघड उघड आव्हान देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकारणात आज मित्र असलेले येत्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या सामोरे उभे ठाकण्याचे संकेत मिळत आहेत.nnमहाविकास आघाडी अस्तिवात येत असताना एक.कॉमन मिनीमन चा राजकीय तह झाला होता ,असे असताना राज्याचे कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या राज्यमंत्र्यांच्या मतदार संघात येतात आणि कोणत्याही परिस्थितीत इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस सोडणार नाही अश्या स्पष्ट शब्दात “राष्ट्रवादी काँग्रेस” च्या मतदार संघात येऊन त्यांनी डिवचले आहे.nnया विधानाची तसेच काँग्रेस चे नेते इंदापूरात येतात आणि विधानसभा जागे विषयी वक्तव्य करून तालक्यात जोरदार चर्चेला उधाण येतं आहे.nnइंदापूर शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.nयावेळी रामवडकुते, इंदापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत, कार्याध्यक्ष काकासाहेब देवकर, किसान सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. संतोष होगले, बीएमपीचे राष्ट्रीय महासचिव अँड. राहुल मखरे, प्रा. कृष्णा ताटे, भगवान फासगे, संतोष आरडे तुषार शेळके, महादेव लोंढे, श्रीनिवास पाटील, आकाश पवार, युवराज गायकवाड, विपुल भिलारे, राहुल जाधव, राहुल वीर, रमेश शिंदे, भगवान कोळेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *