Uncategorized

कांदा, बटाटा, कारली, मिरची, पावटा स्वस्त , मटारच्या दरात वाढ

कांदा, बटाटा, कारली, मिरची, पावटा स्वस्त , मटारच्या दरात वाढnn( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )nnपुणे : घाऊक बाजारात कांदा, बटाटा, हिरवी मिरची, कारली, ढोबळी मिरची, पावटा या फळभाज्यांच्या दरात घट झाली.nमटारच्या दरात वाढ झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.nगुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात राज्य तसेच परराज्यातून मिळून ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली.nघाऊक बाजारात आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १५ ते १६ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा,nमध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो गाजर,nमध्य प्रदेश आणि गुजरातमधून १० ते १२  ट्रक लसूण,nगुजरात आणि कर्नाटकातून मिळून ४ ते ५ टेम्पो कोबी,nआग्रा, इंदूर, गुजरात तसेच स्थानिक भागातून मिळून ७० ते ७५ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली,nअशी माहिती बाजारातील प्रमुख व्यापारी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.nपुणे विभागातून सातारी आले ११०० ते १२०० गोणी, टोमॅटो ६ ते ७  हजार पेटी,nढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो,nफ्लॉवर १० ते १२ टेम्पो,nगवार ४ ते ५ टेम्पो, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो,nतांबडा भोपळा ५ ते ६ टेम्पो,nपुरंदर,पारनेर,वाई भागातून ४०० ते ५०० गोणी मटार,nभुईमूग शेंग एक हजार गोणी, पावटा ४ ते ५ टेम्पो,nकांदा ६० ते ७० ट्रक अशी आवक झाली.nकोथिंबीर, मेथी, चाकवत महाग कोथिंबीर, मेथी, चाकवत, अंबाडी या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.nशेपू, कांदापात, करडई, पुदिना, राजगिरा, चवळईच्या दरात घट झाली आहे.nपालकाचे दर स्थिर आहेत.nमार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीच्या दीड लाख लाख जुडी तसेच मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *