गांजा लागवडीची परवानगी दया!
बाभळी गावचे शेतकरी भाऊराव शिंदे यांची मागणी
शिव-कल्याण न्यूज नेटवर्क
आयुर्वेदिक वनस्पती असलेल्या गांजा या पिकाची लागवड करण्यास महाराष्ट्र राज्यात बंदी आहे,या वनस्पती औषध कंपन्यांनाकडून मागणी होत असते,त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो,हा अपेक्षेने कळमनुरी तालुक्यातील बाभळी गावचे शेतकरी भाऊराव शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
शेतकरी भाऊराव शिंदे यांच्या म्हणण्यानुसार शेतात कोणतेही पीक घेतले तरी शेती तोट्यात जाते,यातून बाहेर पडण्यासाठी गांजा लागवडीस परवानगी मिळावी,असे निवेदन केले आहे.
