नवनीत राणांची “खासदारकी वाचवण्यासाठी” सर्वोच्च न्यायालयात “रिव्ह्यू पिटिशन”!
हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात
सचिन तरंगे (शिव कल्याण न्यूज नेटवर्क)
वृत्तसेवा:-
खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं, हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आणि स्वतःची खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात”रिव्ह्यू पिटिशन”!दाखल करण्यास धाव घेतली आहे.
नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात “रिव्ह्यू पिटिशन” दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
राज्यात “युवा स्वाभिमान पक्षाच्या “नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना राजकीय धक्का बसला आहे.त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्या च्या निर्णय देताना नवनीत राणा यांना हायकोर्टाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे.
हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आणि खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल करीत आहेत.
शिवसेना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या “जात प्रमाणपत्रावर”जोरदार आक्षेप घेत हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे.
नवनीत राणा यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता.त्यावेळी अपक्ष उमेदवार म्हणून त्या अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लविण्यासाठी त्यांना काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला होता.
नवनीत राणा ची “राजकारणात एन्ट्री”-
नवनीत राणा यांचे आमरवतीच्या बाडणेर विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांच्या बरोबर 2011 ला लग्न झाले, त्यानंतर त्या राजकारणात सहभागी झाल्या,2014 साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी चारवेळा खासदारकीची टर्म भूषविलेले शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात राजकीय संघर्ष झाला. मात्र, या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या.
त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून राष्ट्रवादी व काँग्रस पक्षाच्या पाठिंब्यावर आनंदराव अडसूळ यांचा 36000 मतांनी पराभव केला.
सर्वोच्च न्यायालय खासदार नवनीत राणा यांच्या “रिव्ह्यू पिटिशन”वर काय निर्णय घेणार याब्बत राज्यातील राजकीय तज्ञांचे लक्ष लागले आहे.
