आघाडी सरकार मधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवताहेत!
गोपीचंद पडळकरांचा सरकार वर घणाघात.
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
महाराष्ट्र राज्यातील आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी आहे. मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावरून या सरकारने मोठं षडयंत्र रचलं आहे, असा राजकीय गौप्यस्फोट करतानाच सरकारमधील “मंत्रीच” आरक्षणाचा वाद पेटवत असल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे विधानसभेतील सदस्य तथा आमदार गोपीचंद पडळकर “चौंडी” येथे आले होते. त्या वेळी त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी हा गंभीर आरोप केला.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी विविध जाती च्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
राज्यातील सरकार “ओबीसी आणि मराठा” आरक्षणाच्या विरोधात आहे. या आरक्षणावरून राज्यातील आघाडी सरकारचं फार मोठं षडयंत्र आहे, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. हे राज्यसरकार निष्क्रीय आहे. कोणता निर्णय कधी घ्यायचा,व तो कसा आमालात आणायचा हे या सरकारला कळतच नाही. सरकारमधील मंत्रीच आरक्षणावरून वाद पेटवत आहेत, असा आरोपही पडळकर यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार व राज्याच्या चे उपुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर राजकीय निशाणा साधत काका-पुतण्यासमोर राज्यातील काँग्रेसचे नेते मान डोलवताहेत,यावेळी काँग्रेसवर ही टीकास्त्र सोडले. राज्यातील काँग्रेस सत्तेसाठी लाचार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्राचीही दखल ही राज्यसरकार घेत नाहीत, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
पदोन्नतीतील आरक्षणासाठी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा देऊ असा इशारा दिला होता. त्याचं काय झालं? काँग्रेस नेत्यांना कोणतीही लाज राहिली नाही. बारामतीच्या काका-पुतण्यासमोर काँग्रेसचे नेते नुसती मान डोलवत आहेत. यांचं सरकारमध्ये राज्यातील काँग्रेस च काहीच चालत नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी प्रदेश काँग्रेसवर केली.
सरकार राज्यात प्रत्येक प्रश्नावर धर सोडीचे धोरण अवलंबत आहे. राज्यासाठी हे धोरण अत्यंत घातक आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात येत्या काळात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
आरक्षणासाठी ओबीसींनी आज राज्यभरात आंदोलन सुरू केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजाने (OBC) आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ओबीसी आरक्षण वाचवा यासाठी नाशकात आक्रोश आंदोलन करण्यात आलं. सध्या या आंदोलनासाठी स्वत: छगन भुजबळ हे रस्त्यावर उतरले नसले, तरी त्यांच्याच नेतृत्त्वात हे आंदोलन होत आहे,सरकार मधील मंत्र्यावर आरक्षणासाठी आंदोलन करण्याची वेळ येते ,यात नक्कीच कोणाचा विश्वास नाही की हा स्टंट आहे,हा बाब समजली पाहिजे.असा सवाल पडलकर यांनी केला आहे.
भाजपचे आक्रमक नेते
गोपीचंद पडळकर हे भाजप चे आक्रमक नेते आहेत,बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व ते करीत आहे,धनगर आरक्षण,मागास प्रवर्गातील पदोन्नती आरक्षण,राज्य लोकसेवा आयोग परीक्षा ,या मुद्यावर ते आक्रमक भूमिका घेऊन राज्यात सरकार ला त्यांनी घेरले आहे.
