सरपंचाला 40 हजार रुपयांची लाच घेताना अटक
आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे यास अटक
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
सांगली जिल्ह्यातील,आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभासगाने रंगेहाथ पकडले. करगणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मंगळवारी (15 जून) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सरंपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सरपंचाला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी करगणी येथून रस्ता काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले आहे.
या कामाचे बिल मंजूर करुन जमा केल्याच्या मोबदल्यात करगणीचे सरपंच गणेश खंदारे याने बिलाच्या 4 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती.
याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी केली असता सरपंच खंदारे याने तक्रारदारांकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तक्रार दाखल झाल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तातडीने या घटनेची गंभीर दखल घेत पडताळणी केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रादाराच्या तक्रारीनुसार करगणी ग्रामपंचायतीजवळ
सापळा रचला.
त्यानंतर सरपंच खंदारे याला तक्रारदारांकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. अखेर याप्रकरणी संरपंचाविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटने मुळे एकच खळबळ उडाली आहे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, यांनी ही कारवाई केली.
