ग्रामसेवक युनियनच्या इंदापूर तालुकाध्यक्ष पदी लक्ष्मीकांत जगताप व उपाध्यक्षपदी सौ अंबिका पावशे यांची निवड
तर सचिव पदी नीलकंठ गिरी यांची नियुक्ती
सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)
राज्यातील महत्वपर्ण म्हणून कार्य कौतुक असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या इंदापूर तालुका अध्यक्षदासाठी निमगाव केतकी चे ग्रामसेवक लक्ष्मीकांत जगताप तर तालुका उपाध्यक्ष पदी रेडणी ग्रामपंचायत च्या ग्रामसेविका सौ अंबिका पावशे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या इंदापूर तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून इंदापूर तालुका सचिव पदी ग्रामसेवक नीलकंठ गिरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या बैठकीत त्यांच्या निवडीबद्दल या युनियन मधील सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
