बावडा येथे राजवर्धन युवामंचच्या शाखेचे उद्घाटन
इंदापूर: प्रतिनिधी दि.11/6/21
बावडा येथे राजवर्धनदादा युवा मंचच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन निरा भिमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.11) करण्यात आले.
यावेळी बोलताना राजवर्धन पाटील यांनी सांगितले की, ज्या समाजात आपण आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या जाणिवेतून युवकांनी समाजोपयोगी कार्यामध्ये सहभाग घ्यावा.
यावेळी सरपंच किरण पाटील, नीरा-भीमा कारखान्याचे माजी संचालक विकास पाटील, रणजित घाडगे, नवनाथ पवार, अभिजित साळुंखे, सुरज माने उपस्थित होते.राजवर्धनदादा युवा मंचचे मार्गदर्शक अमर कांबळे, संस्थापक-अध्यक्ष शाहरुख शेख, अध्यक्ष आशिष सरवदे, उपाध्यक्ष इब्राहिम शेख, कार्याध्यक्ष अजित जाधव, सरचिटणीस ओंकार घाडगे अशी पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. सुत्रसंचालन शशिकांत जाधव यांनी केले.यावेळी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
