Thu. Apr 30th, 2026

निरा भिमा कारखान्याचे ऊस लागवडीचे धोरण जाहीर

Spread the love

निरा भिमा कारखान्याचे ऊस लागवडीचे धोरण जाहीर
– 15 जून पासून लागवडीस परवानगी
इंदापूर:प्रतिनिधी दि.10/6/21
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवड हंगाम सन 2021-22 करीताचे ऊस लागवडीचे धोरण माजी सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी जाहीर केले.
या लागवड धोरणानुसार ऊस उत्पादन तंञाचा अवलंब करून शेतक-यांनी जास्तीत जास्त क्षेञावरती लागवड करून ऊसाचे प्रति एकरी सुमारे 100 टनाहून अधिकचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले.
नीरा भीमा कारखान्याचे ऊस लागवडीचे धोरण पुढीलप्रमाणे-
1) आडसाली-
लागवड कालावधी – 15 जून ते 31 ऑगस्ट, दिवस 77, (लागवडीचे क्षेत्र 15 टक्के)- फुले 0265
दि. 1 जुलै. ते 31 ऑगस्ट., दिवस 61 (लागवडीचे क्षेत्र 15 टक्के)- को.86032 व व्ही.एस.आय.8005
2) पूर्व हंगाम – ( लागवडीचा कालावधी -1सप्टें. ते 30 नोव्हें., दिवस 91 (लागवडीचे क्षेत्र 30 टक्के) -कोसी 671, को.86032, व्ही.एस.आय.8005, एम.एस.10001, व्ही.एस.आय.434
3) सुरु – ( लागवडीचा कालावधी -1डिसें. ते 30 एप्रिल, दिवस 151 (लागवडीचे क्षेत्र 15 टक्के) -कोसी 671, को.86032, व्ही.एस.आय.8005, एम.एस.10001, व्ही.एस.आय.434
4) खोडवा- (कारखाना सुरू झालेपासून ते बंद होईपर्यंत (लागवड क्षेत्र 40 टक्के)- वरील सर्व जाती.
शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड पूर्ण होताच त्या क्षेत्राची नोंद त्याच दिवशी शेतकी विभागाकडे देणे बंधनकारक आहे. तसेच जेवढ्या क्षेत्राची लागण पुर्ण झाली आहे, तेवढ्यात क्षेत्राची लागण तारीख ग्राह्य धरली जाईल, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
ऊस उत्पादक शेतक-यांनी योग्य बेणे निवड, बेणे प्रक्रिया, लागवड पध्दती,रोप लागण पध्दत, रासायनिक खतांच्या माञा, ठिबक मधून द्यायवयाची खते, किड व रोगांचे नियंत्रण या प्रमाणे ऊस उत्पादनाचे तंञ वापरल्यास प्रति एकरी 100 टन किंवा अधिकचे ऊसाचे उत्पादन घेता येईल. ऊस तोडणीचा कार्यक्रमात ऊस लागवड तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार कोसी 671, व्ही.एस.आय.434 व एम.एस.10001 या लवकर पक्व होणा-या व जादा साखर उतारा असणा-या ऊस जातींची प्राधान्याने तोडणी करण्यात येईल. त्यानंतर को.86032 या ऊस जातीची तोडणी करण्यात येईल व त्यानंतर फुले 265 या ऊस जातीची तोडणी ही लागण तारखेच्या व सॅम्पल अहवालानुसार केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
निरा भिमा कारखाना ऊस विकास योजना प्रभावीपणे राबवित आहे. त्यामध्ये ठिबक सिंचन योजना, बेणे पुरवठा, माती परीक्षण यांचा ऊस उत्पादक शेतक-यांनी लाभ घ्यावा.तसेच कारखान्याकडील उत्पादित सेंद्रिय खतांचा वापर हा ऊस उत्पादक शेतक-यांनी करावा, असे आवाहनही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी केले.
याप्रसंगी विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, दादासो घोगरे, हरिदास घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगिता पोळ, जबीन जमादार या संचालकांसह कार्यकारी संचालक डी.एन. मरकड उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!