Thu. Apr 16th, 2026

रणसिंग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत कुरवली गावात विविध उपक्रमांचे आयोजन

Spread the love

रणसिंग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत कुरवली गावात विविध उपक्रमांचे आयोजन

img 20260122 123854

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब वालचंदनगर या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरार्थींकडून इंदापूर तालुक्यातील कुरवली या गावातील धार्मिक स्थळे, ग्रामपंचायत कार्यालय व स्मशानभूमीतील कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक डॉ. अनिल बनसोडे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यादरम्यान अनेक व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. त्यामध्ये डॉ. सुधीर इंगळे यांनी लोकसहभागातून स्वच्छता अभियान, श्री. राजाभाऊ सोनवलकर यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि मी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांनी कीर्तनातून समाज प्रबोधन तसेच डॉ. अरुण कांबळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना व युवक इत्यादी विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.

राष्ट्रीय सेवा योजना विभाग व गिरीराज ब्लड सेंटर बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. नितीन कारभारी यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच या ठिकाणी अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंसेवकांकडून कुरवली गावातील आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले. गावातील एकूण 70 कुटुंबाचा सर्वे करण्यात आला.

यादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे, प्रा. सुवर्णा बनसोडे तसेच इतर प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. पुढील दिवसात स्मार्ट सुनबाई, हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

Related Post

error: Content is protected !!