Sat. Jun 6th, 2026

ग्रामीण भागातून शास्त्रज्ञ घडावेत…विरसिंह रणसिंग 

Spread the love

ग्रामीण भागातून शास्त्रज्ञ घडावेत…विरसिंह रणसिंग

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब आणि महाविद्यालयातील विज्ञान विभाग व बेस्ट प्रॅक्टिसेस समितीच्या वतीने दिनांक-२५/०९/२०२४ रोजी महाविद्यालयात सायन्स फेस्ट-२०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी कळंब परिसरातील दहा विद्यालयांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी स्पर्धा आयोजित करण्यामागील हेतू मांडला.जास्तीत जास्त शास्त्रज्ञ ग्रामीण भागातून तयार व्हावेत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळाव्यात या हेतूने आम्ही स्पर्धा आयोजित करत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उदघाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ.विजय केसकर उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग प्रा.विलास बुवा,प्रा.राजेंद्र डांगे प्रा.सुहास भैरट तसेच या स्पर्धेचे परीक्षक इंदापूर महाविद्यालय येथील प्रा.डॉ.राजेंद्र साळुंखे आणि टी. सी महाविद्यालय बारामती येथील प्रा.डॉ. विजय मोहिते तसेच विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील प्रा.डॉ. प्रशांत शिंदे उपस्थित होते. त्याचबरोबर लेट साहेबराव फडतरे,बारामती येथील प्रा.गणेश  सवाणे,फडतरे कॉलेज येथील प्रा.तमन्ना तांबोळी,प्रा.सतीश सराफ,प्रा.सावंत सर,प्रा.बोराटे सर,प्रा.नागणे मॅडम,प्रा.केदार मॅडम,प्रा.अंबिका मॅडम,प्रा.पाटील मॅडम,प्रा.गंगणे सर,प्रा.सचिन माने उपस्थित होते.

या स्पर्धेत एकूण ९३ स्पर्धक सहभागी झाले.त्यापैकी पोस्टर मेकिंग स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तर मॉडेल मेकिंग स्पर्धेत ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले होते व त्यावर आधारित पोस्टर आणि मॉडेल तयार करण्याचे आवाहन करण्यात आले होते,प्रामुख्याने प्लॅस्टिक पुनर्वापर, भारतीय प्राचीन संस्कृती, आणि ए.आय टेक्नॉलॉजी यावर आधारित विषयांवर विद्यार्थ्यांनी सुंदर असे पोस्टर आणि मॉडेल सादर केले.

पोस्टर मेकिंग स्पर्धेचे विजेते महाविद्यालय अनुक्रमे पुढीलप्रमाणे.
१. श्री वर्धमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वालचंदनगर
२.विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर
३.कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय, कुरवली

मॉडेल मेकिंग स्पर्धेतील विजेते महाविद्यालय अनुक्रमे पुढीलप्रमाणे.
१.एन.ई. एस. हायस्कूल ज्यनियर कॉलेज निमसाखर
२.एल.जी.बनसोडे विद्यालय पळसदेव
३.विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब.
सर्व विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.संस्थेचे सचिव मा.विरसिंह रणसिंग यांनी विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स फेस्ट-२०२४ च्या समन्वयक प्रा.काजल राजेभोसले यांनी केले तर बक्षीस वितरण समारंभाचे प्रास्ताविक प्रा.सुहास भैरट यांनी केले,सूत्रसंचालन प्रा.सचिन आरडे आणि प्रा.कपिल कांबळे यांनी केले तर आभार प्रा.महादेव माळवे आणि प्रा.आकांक्षा मेटकरी यांनी मानले.

Related Post

error: Content is protected !!