एन.एस.एस.च्या माध्यमातून गावगाड्याचा सर्वांगीण विकास

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे, विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब-वालचंदनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक २३/०९/२०२४ रोजी कळंब या गावामध्ये स्वछता व पर्यावरण जनजागृती याविषयी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागातील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला,प्रामुख्याने या फेरीत विविध प्रकारची वाद्य वाजवून घोषणा देऊन स्वयंसेवकांकडून जनजागृती करण्यात आली. तसेच पथनाट्यातून सामाजिक संदेश देण्यात आला.
तसेच दिनांक २४/०९/२०२४ या रा.से.यो.दिनानिमित्त महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये रांगोळी स्पर्धा व महाविद्यालय परिसर स्वछता हे उपक्रम राबविण्यात आले, तसेच रा.से.यो.दिन ग्रा.पं.कुरवली गावचे सरपंच श्री.राहुल चव्हाण यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना गीताने करण्यात आली.मा. राहुल चव्हाण यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावगाड्याचा सर्वांगीण विकास करता येतो असे मत व्यक्त केले. गावामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता तसेच सामाजिक प्रबोधन राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी करत असतात त्यामुळे समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी करतात असे सांगितले.
हे दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी-राजेंद्रकुमार डांगे तसेच प्रा.सुवर्णा बनसोडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले,संस्थेचे सचिव श्री.विरसिंह रणसिंग यांनी दोन्ही कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य. डॉ.विजय केसकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना एनएसएस आणि माझी जडण घडण याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग, डॉ.प्रशांत शिंदे (IQAC प्रमुख) प्रा.डॉ.अमर वाघमोडे,प्रा.रवी गायकवाड, प्रा.तेजश्री जाधव,प्रा.कपिल कांबळे, प्रा.सचिन आरडे, प्रा. डॉ.तेजश्री हुंबे, डॉ.अमित शेटे उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रा.राजेंद्रकुमार डांगे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार शिवानी चव्हाण व श्रुती साबळे यांनी केले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गीताने झाली.
