
175 मतदार कळंब ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानापासून वंचित ठेवल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल व प्रलंबित !
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कळंब ( ता.इंदापूर ) येथील प्रभाग क्रमांक 3 मधील मागासवर्गीय मतदारांना प्रशासनाने मतदान करण्यापासून वंचित ठेवल्याची रितसर ( st.28561/2023 ) हनुमंत सुखदेव बनसोडे व इतर यांची तक्रार मे. हायकोर्ट मुंबई यांनी दाखल करून घेतली आहे. ती आज अखेर प्रलंबित आहे.
याचिकेत हनुमंत सुखदेव बनसोडे व इतर यांनी वेळोवेळी कळंब ग्रामपंचायत ग्रामसेवक,तलाठी, अंथुर्णे मंडल अधिकारी, इंदापूर तहसिलदार, पुणे जिल्हाधिकारी, निवडणूक आयोगाकडे लेखी अर्ज दाखल केलेला आहे. हि सर्व कागदपत्रे पुरावा म्हणून याचिकेत सोबत जोडलेली आहेत.
याचिकेकर्त्यांनी आपली तक्रार सचिव महाराष्ट्र शासन, पुणे विभागीय कमिशनर, जिल्हाधिकारी, तहसीलदार इंदापूर, अंथुर्णे मंडल अधिकारी, ग्रामसेवक कळंब ग्रामपंचायत, तलाठी कळंब, व मुख्य निवडणूक अधिकारी यांचे विरोधात दाखल केलेली आहे.
तक्रारदार व मतदानापासून वंचित राहिलेले 175 मतदार यांना न्याय कधी मिळणार ? किंवा त्यांना मतदान करता येणार का ? का संपूर्ण ग्रामपंचायत कार्यकारिणी बरखास्त होणार ! हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
