माहिम सार्वजनिक वाचनालय मार्फत पुस्तक परिक्षण स्पर्धा

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मण लोंढे यांच्या राज्यपुरस्कारप्राप्त ‘ धर्मयोद्धा ’ या कथासंग्रहावर माहीम सार्वजनिक वाचनालयातर्फे परीक्षण स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
सिद्धहस्त लेखक लक्ष्मण लोंढे यांच्या नवव्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ लोंढे कुटुंबियांच्या संकल्पनेनुसार आणि सहकार्यानं ही स्पर्धा घेण्यात येत आहे.
स्पर्धकांनी आपले परीक्षण ई मेलवर सोमवार दिनांक १ जुलै २०२४ पर्यंत पाठवावे.
स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दिनांक २७ जुलै २०२४ रोजी माहीम सार्वजनिक वाचनालयात आयोजित करण्यात येईल.
*धर्मयोद्धा या पुस्तकाची पीडीएफ माहीम सार्वजनिक वाचनालयाच्या https://www.mahimlibrary.in या वेबसाईटवर १ जुलै २०२४ पर्यंतच उपलब्ध असेल.*
स्पर्धेसाठी नियम :–
१) १ जुलै २०२४ नंतर आलेले पुस्तक परीक्षण विचारात घेता येणार नाही.
२) पुस्तक परीक्षणासाठी धर्मयोद्धा या कथासंग्रहातील सर्व कथांचा परामर्श घेतलेला असावा.
३) पुस्तक परीक्षणासाठी शब्दमर्यादा १२०० शब्दांची आहे. परीक्षण मुद्देसूद आणि स्वलिखित असावे.
कुठल्याही लिखाणाची नक्कल (COPY) नसावी.
४) स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता व फोन नंबर परीक्षणाचे लेखन संपल्यावर स्वतंत्र पानावर लिहावे.
५) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
अधिक माहितीसाठी संपर्क :
माहीम सार्वजनिक वाचनालय
बृहन्मुंबई महानगरपालिका समाजकल्याण केंद्र,
माहीम सार्वजनिक वाचनालय मार्ग,
ऑफ ले.दिलीप गुप्ते मार्ग,माहीम,मुंबई ४०००१६
दूरध्वनी : ०२२ २४४६३४७३, ०२२६२५१३२८०
भ्रमणध्वनी : ९३२१३०५०१३
Email – mahimvachanalaya@gmail.com
Website – www.mahimlibrary.in
