ए. आर. टी. सेंटर च्या सेवेची कर्तृत्वाने भारवलेली 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गौरव सोहळा

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली, येथील ए. आर. टी. सेंटर ला वीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एन. एम. पी. प्लस विहान काळजी व आधार केंद्र सांगली यांच्या वतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
हा सोहळा दि.30 मे 2024 रोजी साजरा करण्यात आला, यात ए. आर. टी. मधील सेवकांचा व 20 वर्षे ए. आर. टी. औषधपचार घेणाऱ्या रुग्णाचा भेटवस्तू व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कर्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून प. व. पा. शा. रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन मा. विक्रमसिंह कदम, नोडल ऑफिसर मा. डॉ राजेंद्र भागवत सर,डापकू चे मा. डॉ विवेक सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ दीपक कुलकर्णी सर,डॉ गौरी वाटवे मॅडम, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, डाटा मॅनेजर, विहान csc स्टाफ तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था चे कर्मचारी उपस्थित होते.
तसेच ए. आर. टी. औषधपचार घेणारे रुग्ण उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्वात पहिले ए. आर. टी. सेंटर सुरु करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत करण्यात आले,20 वर्षे औषध घेणाऱ्या रुग्णाचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रुग्णांनी आपले मनोगत वक्त केले, आधी औषध साठी करावी लागणारी धडपड व सध्याची परिस्थिती रुग्णांनी मांडली. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम ची सुरुवात व प्रस्तावना सांगली विहान च्या प्रकल्प समन्व्यक वासंती कांबळे यांनी केले. विहान कार्याचा आढावा कार्यक्रमास उपस्थित असलेले NMP± चे टेक्निकलं ऑफिसर प्रवीण पारसे सर यांनी सांगितला.
कार्यक्रमास सांगली विहान चे कर्मचारी चंद्रकांत तिवडे, वर्षाली कांबळे, साक्षी फडतरे, सुशीला हाबळे, रुपाली मोकळे, रंजना विटेकरी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित तांचे आभार विहान च्या संजीवनी पाटील यांनी मांडले. आशा तर्हेने कार्यक्रम ची सांगता झाली.
