Sat. Jun 6th, 2026

कलेढोण येथील रूग्णालयास रुग्णवाहिकेचे लोकार्पण

Spread the love

कलेढोण येथील रूग्णालयास रुग्णवाहिकेचे लोकार्पण

कलेढोण ता.खटाव येथील माजी मुख्यमंत्री स्वर्गीय बॅरिस्टर बाबासाहेब भोसले कुटीर रुग्णालयास महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन sमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली.

यावेळी शासनाकडून कुटीर रुग्णालय कलेढोण करिता प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले, तसेच कुटीर रुग्णालय दुरुस्तीचे अंदाजपत्रक तात्काळ बनविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी पंचायत समितीचे सभापती चंद्रकांत पवार, सुरेशनाना शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अशिक्षक अभियंता मुनगिलवार, प्रांताधिकारी जनार्दन कासार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.समीर तांबोळी, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.युनूस शेख, सरपंच सौ.प्रीती शेटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!