सुप्रिया सुळेच्या प्रचारार्थ रेडा गावात सभेचे आयोजन!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
रेडा (ता इंदापूर )येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक.27/04/2024 सकाळी 11.30 वाजता सभा होणार आहे.
या प्रचारार्थ होणाऱ्या सभेस शरयू फाउंडेशनच्या प्रमुख सौ.शर्मिलावहिनी पवार,मार्गदर्शन करणार असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोल भिसे,तालुकाध्यक्ष तेजससिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष सागरबाबा मिसाळ, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल मुळे,रेडा गावचे ज्येष्ठ नेतेआणि नीरा भीमा कारखान्याचे संचालक बबन देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती सभेचे आयोजन केलेले आहे.
