Fri. Apr 24th, 2026

बारामती लोकसभा मतदार संघात कधी न विचारलेल्या कार्यकर्त्यांचा शोध सुरू पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागली विचारणा !

Spread the love

बारामती लोकसभा मतदार संघात कधी न विचारलेल्या कार्यकर्त्यांचा शोध सुरू पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागली विचारणा !

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक 7 मे ला होत आहे. या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार या पक्षांकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वंचित ने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे.

लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक सुरू झाली आणि गेल्या पाच वर्षांपासून अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांची आणि नेतेमंडळींनी शोधमोहीम या पक्ष्याच्या उमेदवारांनी सुरू केली आहे. मध्यंतरी च्या राजकीय कालावधीत उमेदवार, पदाधिकारी विचारत नसल्याने कार्यकर्ते जवळपास गायब झाले होते.

महायुतीच्या आमदार जवळ फक्त या फायरब्रँड नेते, पदाधिकारी,सगेसोयरे,व ठेकेदार यांचा कोंडावळा होता.मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षांचे नेते हे या अडगळीत आणि दूर ठेवलेल्या कार्यकर्त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करू लागले आहेत.बारामती मतदार संघाच्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस येणार आहेत, असे दिसत आहे. आणि यातच लोकसभा निवडणुकीनंतर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, पुरंदर, खडकवासला या सहा विधानसभा मतदार संघाची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने मतदारसंघात इच्छुक उमेदवार आणि नेतेमंडळी, कार्यकर्त्यांची फळी प्रचाराच्या कामाला लागली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील इच्छुक उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी आपापल्या पक्षाच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार करत आहेत.या मतदार संघात आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या कार्यकर्त्यांची आठवण नेत्यांना होऊ लागली आहे. त्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगात नेतेमडळी आता आवर्जून हजेरी लावत आहे.मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जेमतेम 30 दिवसांचा अवधी आहे. या काळात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचारसभा, कॉर्नरसभा, पदयात्रांवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्याची फळी हवी, मात्र कार्यकर्तेच अपुरे पडणार असल्याने उमेदवारांची दमछाक होत आहे.पण प्रत्यक्षात प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या नेते स्टेजवर पदाधिकारी आणि फायरब्रँडनेत्यांची गर्दी दिसतेय.तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या स्टेजवर नेत्यां पेक्षा कार्यकर्त्यांची गर्दी दिसत आहे.

काहीही असो, पण किमान या मतदार संघात 7 मे पर्यंत तरी अडगळीत पडलेल्या कार्यकर्त्यांना विचारणा होतेय, त्यामुळे सद्या त्यांचं ‘सुगी ‘चे दिवस आहेत.

Related Post

error: Content is protected !!