Fri. Apr 24th, 2026

कळंब येथे हनुमान यात्रा कमिटीची बैठक संपन्न !….. हि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम तर नाही ना ?

Spread the love

कळंब येथे हनुमान यात्रा कमिटीची बैठक संपन्न !….. हि आगामी ग्रामपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम तर नाही ना ?

शिव-कल्याण न्युज नेटवर्क

हनुमान मंदिर कळंब येथे सोमवार दि. १ एप्रिल रोजी सायं. ७.३० वा. हनुमान यात्रा संदर्भात सर्वपक्षीय व सर्व जातीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वांनी एकत्र येवुन एक दिलाने यात्रा करणार असल्याचे सांगितले. हि सर्वपक्षीय यात्रा आगामी ग्रामपंचायत निवडणुकीची रंगीत तालीम तर नाही ना ? अशी खोचक कुजबूज नागरिकांत दिसून आली.

यात्रा तीन दिवस होणार असून, पहिल्या दिवस छबिना व मिरवणूक, दुसरा दिवस कुस्ती व तिसरा दिवस ऑर्केस्टा असे यात्रेचे स्वरूप असणार आहे. यात्रेसाठी जास्तीत-जास्त वर्गणी जमा करण्यावर भर दिला जाणार असल्याचे कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी कळंबचे सरपंच अतुल सावंत, उपसरपंच लक्ष्मण पालवे, संदिप पाटील, जय फडतरे, प्रमोद खंडागळे,पोपट चव्हाण, कळंब सोसायटीचे व्हा.चेअरमन संजय खरात,दिपक पाटील, सोमनाथ घोडके, रमेश कोळी, सागर कोळी, संग्राम कोळी, अंबादास कांबळे सर, समाधान राऊत सर, दादा डोंबाळे, धनंजय वरूडकर, आप्पा खुसपे, दीपक चव्हाण, नितिन जानकर, अमित बामणे आदि युवा वर्ग व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!