रेडणीत खा. सुप्रिया सुळे यांच्या निधीतून “सभा मंडप “- अमोल मुळे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
बारामती लोकसभा मतदार संघांच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या खासदार निधीतून रक्कम रुपये 10 लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल मुळे यांनी दिली.
या बाबतचे बारामती मतदार संघ, स्थानिक विकास कार्यक्रम -2023-2024 अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याचे पत्र राजेश देशमुख, जिल्हाधिकारी तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती कार्यालय, पुणे यांना 11 जानेवारी 2024 रोजी दिले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सुनील खाडे, युवा सरचिटणीस प्रशांत काळकुटे उपस्थित होते.
