Fri. Apr 24th, 2026

अनन्या चव्हाणच्या कलाकृतीचा गौरव!….केंद्र सरकारने घेतली कलाकृतीची दखल

Spread the love

अनन्या चव्हाणच्या कलाकृतीचा गौरव!….केंद्र सरकारने घेतली कलाकृतीची दखल

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

अनन्या चव्हाण रत्नागिरी ही एज्युकेशन सोसायटीच्या सौ .गोदूताई जांभेकर विद्यालय , रत्नागिरी प्रशालेची विद्यार्थिनी आहे. कु. अनन्या चव्हाण हिच्या कलाकृतीचे नवभारत साक्षरता अभियानात तीने सहभाग नोंदविला होता. अनन्याने आपल्या घरातील अशिक्षित आजी आजोबा या दोघांना शिकवण्याचा निर्धार केला.
वेळ मिळेल तसे त्यांना साक्षरतेचे धडे गिरवू लागले. हेच तिने शाळेच्या वर्गातील फळ्यावर रेखाटले.

सदर कलाकृती डाएट चे अधिव्याख्याते श्री. राजेंद्र लठ्ठे यांच्या नजरेस पडली व कलाकृती त्यांना आवडली.मा.संचालक कार्यालय पुणे येथे पाठवली. त्यानंत सदर कलाकृतीची दखल मा.केंद्र सरकार मंत्रालय, दिल्ली या कार्यालयाने घेतली असून सदर साकारलेले रेखाचित्र हळूहळू राज्यभर तसेच नव साक्षरता अभियानाच्या माध्यमातून देशभर व्हायरल करण्यात आले.

सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, रत्नागिरी या प्रशालेची विद्यार्थिनी कु. अनन्या चव्हाण तिने काढलेले प्रौढ साक्षरतेचे चित्र मा. प्रधान सचिव केंद्रीय मंत्रालय, दिल्ली येथे पाठवण्यात येणार असून कु. अनन्या चव्हाण या विद्यार्थिनीचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी तर्फे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन कौतुक व सत्कार करण्यात आला .

शुभेच्छा कार्यक्रम प्रसंगी मा.शिल्पाताई पटवर्धन (कार्याध्यक्षा),मा.सतीश शेवडे (कार्यवाह),मा.राजेंद्र मलुष्टे (अध्यक्ष,शाळा समिती सौ.गो.जां.विद्यालय,रत्नागिरी),मा.आनंद देसाई (नियामक मंडळ सदस्य),मा.सुहासभाऊ पटवर्धन (नियामक मंडळ सदस्य),मा.सचिन वहाळकर (नियामक मंडळ सदस्य),मा.मनोज पाटणकर (नियामक मंडळ सदस्य),विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक अनिल चव्हाण,मार्गदर्शक शिक्षक अनिल सागवेकर उपस्थित होते. कु. अनन्या चव्हाण हिच्यावर संस्था पदाधिकारी, पालक, शिक्षक व समाजातील सर्व स्तरातून
अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Post

error: Content is protected !!