Thu. Apr 23rd, 2026

माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पश्चिम महाराष्ट्र महासंघाच्या अध्यक्ष पदी अनिल वाघेला

Spread the love

माहिती अधिकार पत्रकार संरक्षण पश्चिम महाराष्ट्र महासंघाच्या अध्यक्ष पदी अनिल वाघेला

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

माहिती अधिकार आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने पक्षप्रमुख अभिजीत आपटे तसेच संस्थापक अध्यक्ष अमृता भंडारी डिसीप्लीनरी कमिटी चेअरमन विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय समाजवादी विचार धारेला अभिप्रेत व लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य हि समाजवादी संकल्पना यशस्वी करण्यासाठी माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण महासंघाची ध्येय धोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवून अधोरेखित करण्याची जबाबदारी अनिल रावजी वाघेला यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून केली.

या निवडीबद्दल अनिल वाघेला यांनी सांगितले कि,माझ्यावर जी जबाबदारी व विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासास कसलेही गालबोट लागणार नाही. संविधानिक पध्दतीने कायद्याच्या चाकोरीत राहून ही जबाबदारी पार पाडीन. भ्रष्टाचारारास आळा घालून पिडीतास योग्य न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहीन.

Related Post

error: Content is protected !!