
अनिरुद्धाज अकॅडमी मार्फत कळंब वि.का.सह.सोसायटीत रक्तदान शिबिर संप्पन्न
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
कळंब ( दि.22 ) : अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मार्फत कळंब वि.का.सह.सोसायटीत रक्तदान शिबिर मा.प्राचार्य सुधीर डोंबाळे सर व मा.चेअरमन व विद्यमान व्हा.चेअरमन संजय खरात तसेच सचिनसिंह शिंपी, मंगेशसिंह राठे, विशाखा वीरा यांच्या प्रमुख उपस्थितीत संप्पन्न झाले.

यावेळी रविद्रसिंह वेदपाठक, डाॅ.शिवाजी जाधव, डाॅ.हर्षा जाधव, श्री.व सौ. महादेव कदम, श्री.व सौ. कारखानीस, श्रीमती. बोराटे मॅडम, शिवाजी चव्हाण, ग्रा.पं.सदस्य योगेश डोंबाळे, राजेंद्र ( पिंटू ) डोंबाळे,प्रदिप तेरखेडकर, अमोल परीट, श्रीमंत लोखंडे, सुयश बोराटे, सौरभ जमदाडे, अरविंदसिंह हासपे, मुकुंदसिंह सातव, सोमनाथ बल्लाळ, गणेश कोळी, विपुल लोंढे आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिराचे व्यवस्थापन नातेपुते येथील ज्ञानदिप ब्लड बॅंकेचे डाॅ. हनुमंत माने व स्टाफ यांनी केले. शिबिरात 12 रक्तदात्तांनी रक्तदान केले.
या शिबिरात सद्गुरू श्री अनिरुद्ध ( बापू ) महाराजांचा चाहता वर्ग व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
