Fri. Apr 24th, 2026

चोरांकडून विद्युत मोटार पंप हस्तगत ! सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांची माहिती

Spread the love

चोरांकडून विद्युत मोटार पंप हस्तगत !

सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांची माहिती

( शिवकल्याण न्युज नेटवर्क ) सचिन तरंगे

बावडा पोलीस दूरक्षेत्र पोलीस स्टेशनं हद्दीतील,हवालादिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची महत्वपूर्ण कामगिरी इंदापूर पोलीस स्टेशन अंकित बावडा पोलीस दूरक्षेत्रातील पोलिसांनी पार पाडली.

या परिसरात मोठया प्रमाणात शेतीचे विद्युत पंप,पाण्याचे मोटरी, केबल,तसेच शेळ्या इत्यादी चोरून नेण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर वाढले होते.
त्यामुळे शेतकरी वर्ग मेटकुठीस आला होता. या घटनाचे गांभीर्य लक्षात घेता इंदापूर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी दिलीप पवार,यांनी चोरीचे प्रमाण कमी करण्याबाबत बावडा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील,व त्यांच्या टीम ला मार्गदर्शन करून तपासाची चक्रे वेगात फिरवली.

याच दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना गोपनीय बातमीदारमार्फत विद्युत मोटार पंप चोराबद्द्दल माहिती मिळाली, या खबरीची तात्काळ दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी काटी (ता इंदापूर )येथील 21 वर्षीय इसम सागर शिवाजी साठे यास ताब्यात घेतले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवा उडवी ची उत्तरे दिली.परंतू या बाबत बावडा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक के. बी. शिंदे,माने, पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक कदम,कालसईत, गायकवाड, हेगडे,पोलीस अंमलदार आरिफ सय्यद,अकबर शेख,विक्रम जमादार,विनोद लोखंडे, नंदू जाधव यांनी कसून चौकशी आरोपी ची केली असता गुन्ह्यांची कबुली दिली.

सदर आरोपीकडून पोलिसांनी चोरीचे 11 विद्युत पंप पोलीसानी हस्तगत केले आहेत.

अशा प्रकारे इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये गु. र. नं.449/2022,गु. र. नं.553/2023,गु. र. नं.758/2023, गु र. नं 311/2023 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
बावडा पोलिसांनी विदयुत मोटार चोरांचा आणि चोरलेल्या मोटार पंप चा शोध लावल्याने त्यांच्या कामगिरी चे कौतुक होत आहे.

Related Post

error: Content is protected !!