प्रदीप गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाणपोईचे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
इंदापुर (प्रतिनिधी) : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या वाढदिवसानिमित्त मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांचे संकल्पनेतून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे पाणपोईचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत (आबा) कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.मा.नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, मा.उपनगराध्यक्ष सुरेश नाना गवळी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजीराव मखरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंदापुर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, राष्ट्रवादी महिला इंदापुर शहराध्यक्षा ऊमाताई इंगोले, नगरसेविका राजश्रीताई मखरे, स्मिता पवार, करिश्मा शहा, मिनाताई ढोले याचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी प्रा.अशोक मखरे सर, मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, चंद्रकांत सोनवणे, बाळासाहेब आडसुळ, राजू सागर, राजू गुळीक, दत्तू शिंदे, रणजित ढावरे, पप्पु नामदास, ज्ञानेश्वर सोनवणे, सोमनाथ सोनवणे, सागर सोनवणे, सुमित आरडे, विकास शिंदे, अनिल प्रकाश ढावरे, अजय सोनवणे, बोधिसत्व मखरे आदी मान्यवर उपस्थित होते.
