भिलार ( महाबळेश्वर ) येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन संप्पन्न
पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात कायदे कडक करू – चंद्रकांत पाटील
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
दि.29.महाबळेश्वर : समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शविण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत. यापुढेही अशाच प्रकाराचे काम माध्यमांनी करावे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात कायदे कडक करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
भिलार ( ता.महाबळेश्वर ) येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दिपक केसरकर, खासदार श्रीनिवास पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयकुमार गोरे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने व आदि मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

