Fri. Apr 24th, 2026

भाजप- शिवसेना सरकारची इंदापूरसाठी भेट…भिगवणला रु. 29 कोटी 75 लाख खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेस राज्य शासनाची मंजूरी – हर्षवर्धन पाटील

Spread the love

भाजप- शिवसेना सरकारची इंदापूरसाठी भेट…भिगवणला रु. 29 कोटी 75 लाख खर्चाच्या पाणी पुरवठा योजनेस राज्य शासनाची मंजूरी – हर्षवर्धन पाटील

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

दि.27,इंदापूर : भिगवण शहर व परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत रु. 29 कोटी 75 लाख खर्चाच्या नळ पाणीपुरवठा योजनेस राज्य सरकारने सोमवार, दि. 22 ऑगस्ट 22 रोजी मंजुरी दिली आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

राज्यात नव्याने सत्तारूढ झालेल्या भाजप-शिवसेना सरकारकडून भिगवणकरांना दिलेली ही भेट आहे. या योजनेमुळे भिगवणचा पिण्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारकडून देशात हर घर हर जल ही महत्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. सदर कार्यक्रमांतर्गत 29 कोटी 75 लाख 31 हजार खर्चाच्या या योजनेस शिवसेना-भाजप सरकारने मंजुरी दिलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले. यावेळी पराग जाधव, संजय देहाडे, सरपंच तानाजी वायसे, उपसरपंच शीतल शिंदे उपस्थित होते.

Related Post

error: Content is protected !!