Thu. Apr 23rd, 2026

पालखी दिंडीत ग्रामसंरक्षक दलातील पथकांनी सर्तकता बाळगून काम करा – सपोनि बिराप्पा लातुरे

Spread the love

पालखी दिंडीत ग्रामसंरक्षक दलातील पथकांनी सर्तकता बाळगून काम करा – सपोनि बिराप्पा लातुरे

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

दि. : भवानीनगर छत्रपती हायस्कूल येथे ५५२ पैकी ४२५ मुलांचा भव्य मेळावा आयोजीत करण्यात आला होता, सदर मेळाव्यातील ग्राम संरक्षक दलातील सदस्यांना टी. शर्ट सहा. पोलीस निरीक्षक बी एन लातुरे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी लातुरे म्हणाले की, प्रत्येक ग्राम संरक्षक पथकाने आप-आपल्या हद्दीतील पॉईट कडे सर्तकतेने काळजी घ्यावी, कोणालाही काहीही अडचण भासू नये. अपघात असो किंवा दिंडीतील एखादा वारकरी यांना बरे वाटत नसेल तर, अंब्युलन्स करून द्या, प्रत्येकाची अडचण समजून घ्या, उद्या बेलवाडी येथे गोल रिंगण असल्याने सर्वजण मोठ्या संख्येत हजर रहा, ज्याप्रमाणे आज पोलीस असल्यासारखे वाटले, मोठे सहकार्य लाभल्याने पोलीस दल खुष झाले. कळंब येथील ग्रामसंरक्षक दलातील सदस्य अमेय चव्हाण, हर्षवर्धन हारमोडे, शुभम कोळी, भोसले, शेंडगे, माने हे उपस्थीत होते.

यावेळी सहा फौजदार रतिलाल चौधर म्हणाले की, ग्राम संरक्षक दल हे कष्टाळू व प्रमाणिक आहे, त्यांनी जसे भव्य स्वागत केले त्याचप्रमाणे प्रत्येक ठिकाणी त्यांना पाईट वाटप केले, प्रमाणे पोलीसांना आनंद वाटू लागला त्याप्रमाणे हे पथक आपल्या पॉईटची जबाबदारी शांततेत पार पाडणार आहे.

यावेळी सहा पोलीस निरीक्षक अनिल गुजर नेमणूक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, ग्रामसुरक्षा दल हे पोलिसांच्या अनुपस्थितीत त्या गावातील एक पोलीस म्हणूनच कार्य करणार आहेत. परंतु ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांनी कुणावरही अन्याय होणार नाही किंवा आपल्या पदाचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गुजर नेमणूक अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय बारामती यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की ग्रामसुरक्षा दल हे पोलिसांच्या अनुपस्थितीत त्या गावातील एक पोलीस म्हणूनच कार्य करणार आहेत. परंतु ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांनी कुणावरही अन्याय होणार नाही किंवा आपल्या पदाचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी.

सदर कार्यक्रमाकरिता पोलीस नाईक विनोद पवार तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील 39 गावचे पोलीस पाटील हजर होते.

Related Post

error: Content is protected !!