ग्राम संरक्षक पथके अधिकाधिक सक्षम व्हावीत-उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे 
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
दि.२४ : वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे एकूण ३९ गावे ११ वाड्या वस्त्या असे एकूण ५० गावांना ग्राम संरक्षक पथकातील सदस्यांना टी शर्ट ट्रॅक्स सुट लाठी शिट्टी बॅटरी असे एकूण ५५२ सदस्यांना बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे हस्ते वाटप करण्यात आले. मार्गदर्शन करताना त्यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेली ग्राम संरक्षक पथके अधिकाधिक सक्षम व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. पुणे जिल्हा परिषद सदस्या मा. वैशालीताई पाटील इंदापूर तालुका महिला दक्षता कमीटी, कळंब ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्या अश्विनी गणेश चव्हाण,कु.कल्याणी शहाजीराजे भोसले,अजित माळी,हरिचंद्र गायकवाड-पाटील, नेचर डेअरीचे मॅनेजर शिंदे, सहा.पोलीस निरीक्षक बी.एन.लातुरे, पोलीस उपनिरीक्षक अतुल खंदारे, सहा.पोलीस उपनिरीक्षक रतिलाल चौधर, पो.ना. विनोद पवार, पो.कॉ. बेलदार व ३९ गावचे पोलीस पाटील आणि ४७३ ग्राम संरक्षक पथकातील सदस्य उपस्थीत होते.
यावेळी कौतुकास्पद काम करणारे सदस्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
विलास कणसे पोलीस पाटील मानकरवाडी, कुरवली जाचकवस्ती येथील पोलीस पाटील रेश्मा प्रकाश नेवसे, शितल बापू बागाव पोलीस पाटील जांब तसेच पांडूरंग हिराचंद गायकवाड पाटील सरकारी अभियोक्ता मुंबई हायकोर्ट तसेच ग्राम संरक्षक पथकातील तिघांचा सत्कार करण्यात आला अक्षय झणझणे कुरवली सागर भोसले जाचकवस्ती विनायक बोराटे भरणेवाडी यांचा प्रशिस्त पत्रक देवून गौरव करण्यात आला.तसेच सहा. फौजदार रतिलाल चौधर यांचा पोलीस पाटील यांचे तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी सहा फौजदार रतिलाल चौधर म्हणाले की व्यसन मुक्ती कार्यकम गावोगावी राबविला जातो, त्यांचे आपण समुपदेशन व जेष्ट नागरीकांना मदत केली पाहीजे. पी.एस.आय. खंदारे म्हणाले कि, गावो-गावी चोर्या-मार्या याला आळा बसेल गावात कोणतेही अनुचित घटना घडली तर ताबडतोब माहीती देण्याचे आवाहन केले.
