शिवराज्याभिषेक दिनानिमित्त यश ह्रदयालय फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
वालचंदनगर येथील यश हृदयालय फाउंडेशन यांच्यावतीने ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .
स्पर्धा परीक्षेत यश मिळविल्याने विद्यार्थी शैलेश मोरे (रणगाव PSI),आझम जहांगीर आळंद (वालचंदनगर PSI),वसीम मेहबूब आळंद (वालचंदनगर CA) या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती चेअरमन आर के ग्रुप व राष्ट्रवादी कांग्रेस युवा नेते रविराज खरात , क्रीडा अधिकारी चावले सर,मा. जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले सर,क्षीरसागर सर,सर्वगोड सर,नवनाथ धांडोरे, कळंब ग्रामपंचायत सरपंच विद्या सावंत,कळंब ग्रामपंचायत सदस्य योगेश डोंबाळे, राजेंद्र डोंबाळे, सागर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंधळे यांनी केले, ते म्हणाले हे फाऊंडेशन लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी मदत करते व गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम करते .
या कार्यक्रमात कळंब ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्य अश्विनी गणेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
वायगुडे सर व त्यांच्या टीमने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कार्यक्रम ठिकाणी ज्योत प्रज्वलित केली. कार्यक्रमाचे आभार फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल आंधळे यांनी मानले.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त यश ह्रदयालय फाउंडेशनच्या वतीने गुणवंतांचा सत्कार