मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय.!आ.प्रणिती शिंदे
उजनीच्या पाण्यावरून संघर्ष
सचिन तरंगे ( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
सोलापूर च्या काॅंग्रेस आमदार प्राणिती शिंदे यांनी उजनीच्या पाणी प्रश्नावरून सरकारला व पालकमंत्र्यांना घरचा आहेर दिलाय.
सोलापूरचं पाणी पळविण्याचा प्रयत्न केला, तर रान पेटवू असा इशारा काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी आघाडी सरकारला दिलाय.
मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय, असंही आमदार शिंदेंनी स्पष्ट केलंय.
उजनी धरणाचे पाणी इंदापूर आणि बारामतीला देण्याच्या प्रश्नावर आमदार शिंदेंनी माध्यमांपुढं आपली भूमिका स्पष्ट केलीय.
त्यांच्या या भूमिकेमूळे आमदार प्रणिती शिंदे व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यात संघर्ष तीव्र होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘उजनीचे पाणी 20 वर्षांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी पाईपलाइनद्वारे सोलापूरला आणलं. आता उजनी प्लस असूनही महापालिकेतून याचं नियोजन होत नाहीय. कॉंग्रेस सत्तेत असताना दुष्काळातसुध्दा दोन दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत होतं. तेव्हा उजनी मायनसमध्ये होतं, तरीही पाणीपुरवठा सुरळीत ठेवला
पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना एका रात्रीत दोन कोटी रुपये खर्च करुन सक्शन पंप लावून रात्रीत पाणी आणलं.’
आम्ही सोलापूर हद्दवाढ भागातही दोन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न केला.
आता उजनी प्लसमध्ये असतानासुद्धा पाणी दुसरीकडं वळवण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही काय मेलो का? मला सत्तेशी काही देणं-घेणं नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिलीय.
सोलापूरकरांचं पाणी वळवत असाल तर खबरदार आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा आमदार शिंदेंनी सरकारला दिला आहे.
