Thu. Apr 23rd, 2026

पिंपरी-बुद्रुक सहकारी सोसायटीवर भाजपचा झेंडा , राष्ट्रवादी पॅनलचा 13 – 0 ने पराभव…..

Spread the love

पिंपरी-बुद्रुक सहकारी सोसायटीवर भाजपचा झेंडा ,
राष्ट्रवादी पॅनलचा 13 – 0 ने पराभव…..

राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंना मोठा धक्का…..

(शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

इंदापूर तालुक्यातील पिंपरी-बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पॅनलने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पॅनलचा धुव्वा उडवत 13 – 0 अशा फरकाने पराभव केला.

पिंपरी-बुद्रुक विविध सहकारी सेवा सोसायटीवर गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. परंतु ते वर्चस्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी झेंडा फडकवला.

पिंपरी-बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीतील पराभव राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी नक्कीच धक्कादायक आहे.

Related Post

error: Content is protected !!