अंबादास कांबळे यांची अनुसूचित जमातीच्या तालुका अध्यक्षपदी निवड
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
इंदापूर येथे झालेल्या भाजप तालुकास्तरीय कार्यकारणी निवडीमध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयाचे सहशिक्षक अंबादास कांबळे यांची “इंदापूर तालुका अनुसूचित जमाती तालुका अध्यक्षपदी” निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आज इंदापूर येथे झालेल्या पदग्रहण समारंभामध्ये अंबादास कांबळे यांना महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील अनुसूचित जाती-जमातीतील लोकांना संघटित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणार असल्याचे अंबादास कांबळे यांनी यावेळी सांगितले. सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल कांबळे यांची निवड झाल्याचे सांगितले जाते.
