भारतीय जनता पक्षाच्या इंदापूर तालुका युवा कार्यकारिणी सदस्यपदी अमरदिप काळकुटे यांची निवड
( शिव कल्याण न्युज नेटवर्क )
राज्याचे माजी संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज इंदापूर तालुक्यातील भाजप पदाधिकऱ्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली.
या वेळी इंदापूर तालुक्यातील भाजप च्या युवा कार्यकारणी सदस्य पदी रेडणी येथील युवा नेते अमर दीप काळकुटे यांची निवड करण्यात आली.
रेडणी गावचे अमरदीप काळकुटे हे युवा कार्यकर्ते आहेत,राज्याचे माजी संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.
सद्या ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप मध्ये कार्यरत आहे.त्यांचा संपूर्ण परिवार राजकीय घराण्याशी संबधित असून त्यांचे घराण्यातील प्रत्येक व्यक्तीने राजकीय व शासकीय ,सहकार क्षेत्रात काम केले आहे.
स्वतः अमरदीप काळकुटे यांनी स्वामी समर्थ सहकार सोसायटीचे संचालक पद,तर त्यांच्या मातोश्री सुरेखा काळकुटे यांनी रेडणी ग्रामपंचायतीचे सदस्य,वडील विश्वासराव काळकुटे यांनी ग्रामपंचायतच्या सदस्यपदी काम केले असून सद्या ते अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक आहेत.
अमरदीप काळकुटे यांच्या निवडीने युवा कार्यकर्त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या निवडीने इंदापूर तालुक्यातीतून त्यांना शुभेच्छा व अभिनंदन होत आहे.
