Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/shiv-kalyannews.in/wp-includes/class-wp-http-encoding.php on line 1
उजनीतून इंदापूर ला पाणी देण्याचा आदेश रद्द! जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा आदेश - संपादक :- शहाजीराजे भोसले
Mon. Jun 8th, 2026

उजनीतून इंदापूर ला पाणी देण्याचा आदेश रद्द! जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा आदेश

Spread the love

उजनीतून इंदापूर ला पाणी देण्याचा आदेश रद्द!
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा आदेश…

सचिन तरंगे (शिव कल्याण न्यूज नेटवर्क)

सोलापूर जिल्ह्यातील पाण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उमेश पाटील,आमदार संजय शिंदे व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी “उजनीचं पाच टीएमसी पाणी इंदापूर ला देण्याचा जो 22एप्रिल जो आदेश दिला आहे तो रद्द करण्यात यावा,असा जोरदार आग्रह राज्याचे जलसपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे धरण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातून या निर्णयास जोरदार विरोध होतो आहे.
उजनी जलाशयातील पाण्याच्या एकही थेंबाला धक्का लागणार नाही,22एप्रिलला सर्वेक्षणाचा जो आदेश देण्यात आला होता आता तो रद्द करण्यात आला आहे,अशी हमी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोलापूरकरांना दिली.

कालच सांगोल चे शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी हा आदेश रद्द न झाल्यास रक्तरंजित आंदोलनाचा इशारा महा विकास आघाडी सरकार ला दिला होता.

सोलापूर जिल्ह्यातून या निर्णयास जोरदार विरोध होतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखास टार्गेट केले जातेय,पक्षाची प्रतिमा मलीन होते,भविष्यात सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधींना राजकीय धोका निर्माण होऊ नये.या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेऊन उपयोग नाही,व भविष्यातील रक्तरंजित आंदोलनाला सामोरं जायचं सध्यातरी शक्य नसल्याने हा उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर ला देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला,असे राजकीय वर्तुळात बोलले जातेय .

याबाबत ची बातमी शिव कल्याण न्यूज लाईव्ह मध्ये कालच प्रसिद्ध करण्यात आली होती तोच आज राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजणीचे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील गावांना देण्याचा निर्णय रद्द करत असल्याचं जाहीर केले.

शरद पवारांच्या समोर “राजकीय धर्मसंकट”:-

राज्यात महा विकास आघाडी सरकार आहे,शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,व काँग्रेस पक्ष य या तीन पक्षाचे सरकार आहे.सद्या इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे आहेत,ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत,सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे सांगोला चे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहोळ चे आमदार यशवंत माने, माढा मतदार संघाचे आमदार बबनदादा शिंदे, काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर च्या आमदार प्रणिती शिंदे आहेत.हे महा विकास आघाडी चे आमदार आहेत,विशेष म्हणजे राज्य मंत्री मंडळा त सोलापूर जिल्ह्याचा एकही प्रतिनिधी नाही.
इंदापूर च्या एका आमदाराच्या जागेसाठी “उजनीच्या पाच टीएमसी पाण्यावरून”सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील आठ ते दहा जागेवर “महा विकास आघाडी”ला राजकीय पाणी सोडावे लागेल,याची भीती असल्यानेच पवार कुटुंबीयांनी हा निर्णय तातडीने जयंत पाटील यांना जाहीर करण्यास भाग पाडले,अशी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Related Post

error: Content is protected !!