Thu. Apr 23rd, 2026

‌शरद पवारांकडे उजनी धरण वळवायची यंत्रणा असती तर धरणच पुण्याला नेल असत…

Spread the love

‌शरद पवारांकडे उजनी धरण वळवायची यंत्रणा असती तर धरणच पुण्याला नेल असत…

पाण्यावरून पुणे -सोलापूर जिल्ह्यात वाद

रक्तरंजित आंदोलनाचा शिवसेना आमदार शहाजी पाटील यांचा इशारा…

सचिन तरंगे (शिव-कल्याण न्यूज नेटवर्क)

महाराष्ट्र शासनाच्या आघाडी सरकारने सोलापूर जिल्ह्याच्या सर्व लोकांना ,लोकप्रतिनिधींना अंधारात ठेऊन अचानकपणे उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील गावांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्यावेळी एखाद्या धरणातून पाच टीएमसी पाणी दुसऱ्या जिल्ह्यात वळवायचे आहे,त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि सरकारचा समन्वय पाहिजे होता,मुळात हे एक धरण जर सोडलं तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला दुसऱ्या कोणत्याही धरणावर सिंचनासाठी अवलंबून राहता येणार नाही आणि त्यामुळे उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याची वरदायनी आहे,त्याच बरोबर जिल्यातील शेतकऱ्यांचा प्राण आहे.उजनीच्या पाण्याचं अशा पद्धतीने अचानकपणे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला वळविणे आणि अर्थमंत्र्यांनी तातडीने सहाशे कोटी रुपये त्याला मंजूर करण हे सोलापूर जिल्ह्यावर अन्यायकारक आहे.हा या आघाडी सरकारचा गैर फायदा घेण्याचा प्रयत्न आहे.
उजनीच्या पाण्यावरून पुणे व सोलापूर जिल्ह्यात वाद सुरू झाला आहे.
मुळातच ज्या ज्या वेळी बारामतीकरांना सत्ता मिळाली ,1978 साला पासून त्या त्या वेळी त्यांनी बारामती साठी भरभरून विकासाच्या योजना राबविल्या आहेत.एका बाजूला महाराष्ट्राचे नेते म्हणून शरदचंद्रजी पवार साहेबांची प्रतिमा आणि दुसऱ्या बाजूला सत्ता मिळाल्यानंतर फक्त बारामतीचा विकास आणि बारामतीचे मॉडेल देशभर मिरवत राहणं , हे राज्याच्या नेतृत्वाला शोभत नाही.

आमदार शहाजी पाटील यांना माजी मुख्यमंत्र्याची आठवण….

स्व. यशवंतरावजी चव्हाण, स्व. वसंतदादा पाटील,स्व. शंकररावजी चव्हाण, स्व.वसंतराव नाईक या महान नेत्यांनी ज्या ज्या वेळी राज्याचं नेतृत्व केले त्या त्या वेळी संपूर्ण राज्य डोळ्यासमोर ठेऊन सर्व समावेशक असा विकास केला.

पवार साहेबाचा स्वभाव नेहमी सत्ता कुठली असली तरी विकास मात्र बारामती कडे.अशा पद्धतीने त्यांचा कारभार आहे.1994 साली मुख्यमंत्री पदाच्या काळात फक्त पुणे जिल्हा त नऊ एम आय डी सी सुरू केल्या.
उजनीच पाणी बारामतीच्या औद्योगिक वसाहतीला नेल. उजनीच पाणी बारामतीला पिण्यासाठी नेल, उजनीच पाणी सिनारमास प्रकल्पाला नेल.पूर्वीच उजनीच पाणी भरभरून घेऊन गेलाय,राहिलेलं पाच टीएमसी पाणी,हे धरणच तुम्ही पुण्याला घेऊन जावा.

शरद पवारांवर निशाणा…
धराण बिरान वळवयाची काही “यंत्रणा”असेल ते “धरण” च पुण्याला घेऊन जावा.पण पवार साहेब ,अजित दादा,भरणे मामा, धरण च वळवून पुण्याला घेऊन जातील.ते यंत्र अजून मिळालं नाही हे त्यांचं दुर्दैव!

पालकमत्र्यांवर टीकास्त्र….

सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी सोलापूर चे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर हल्लाबोल केला.भरणे मामा आमचे पालकमंत्री आहेत,त्यांनी जिल्ह्याच पालकत्व स्वीकारले आहे.आणि एका बाजूला ते पालक असताना त्यांनी जिल्ह्याच्या शेतकऱ्याच “नरड दाबन”ही भूमिका अतिशय गैर आणि आयास्थाची आहे.

ठाकरे सरकारला घरचा आहेर…

राज्यात महाविकास आघाडी चे सरकार आहे,ते साधारणतः ठाकरे सरकार या नावाने ओळखले जाते. सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजी पाटील आहेत.ते शिवसेनेचे आमदार आहेत,राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे.उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी हे इंदापूर देण्याचा जो निर्णय झाला आहे तो तातडीने मागे घ्यावा.तो पाठीमागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्याकडे एक शिवसेनेचा आमदार या नात्याने सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न करणार आहे.याची कायदेशीर लढाई लढू!
आणि वेळ पडली तर रक्तरंजीत आंदोलनाला जिल्हा तयार होईल.आणि त्याची जवाबदारी शासनावर राहील, पण हे पाणी आम्ही जाऊ देणार नाही असा सज्जड इशारा शिवसेना आमदार शहाजी पाटील यांनी दिला आहे.
ते आज मतदार संघात पत्रकार परिषदेत बोलत होते.

Related Post

error: Content is protected !!