Fri. Apr 24th, 2026

राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू , रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी

Spread the love
  1. राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू , रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा विचार करून राज्य सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध आजपासून लागू केले आहेत.

युरोप व युके मध्ये रूग्ण संख्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे दुप्पट वेगाने वाढत आहे. जगात ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात प्रसार बघून निर्बंध कडक करण्याबाबत विचार होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू नये म्हणून सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

आजपासून लावण्यात आलेल्या निर्बंधांचे स्वरूप हे प्राथमिक असून, ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Related Post

error: Content is protected !!