निलेश ( सोनु ) ढावरे शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये प्रथम
( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत आयोजित हुतात्मा महाविद्यालय राजगुरुनगर येथे घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये इंदापूर येथील निलेश ( सोनु ) राहुल ढावरे याने प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
ढावरे याने मिळविलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. श्रीरामपूर येथे दि. २० डिसेंबर रोजी होणा-या विभागीय स्पर्धेसाठी ढावरे याची निवड करण्यात आली आहे.
