Fri. Apr 17th, 2026

डॉ. बाबा आढाव यांना यंदाचा ‘आबासाहेब वीर’ पुरस्कार जाहीर!

Spread the love

डॉ. बाबा आढाव यांना यंदाचा ‘आबासाहेब वीर’ पुरस्कार जाहीर!

( शिव-कल्याण न्युज नेटवर्क )

उपेक्षित, वंचितांसाठी आपली हयात वेचणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ आणि आरोग्य सेवेत क्रांती करणारे माय लॅबचे संस्थापक हसमुख रावल यांना ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
दरम्यान करोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार वितरण सोहळा होणार नसून पुरस्कारार्थींना त्यांच्या पुणे येथील बाबा आढाव यांना हमाल पंचायत येथे तर रावल यांना निवासस्थानी जाऊन सन्मानपूर्वक हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत,
अशी माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ गेल्या पंचवीस वर्षांपासून ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.
पुरस्काराचे यंदाचे पंचवीसावे वर्ष आहे.
एक लाख रूपये आणि सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जीवनाच्या विविध क्षेत्रात समाजहिताचे कार्य अखंडपणे करित युवा पिढीला प्रेरक ठरणान्या तसेच जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीचाही सन्मान व्हावा या उद्देशाने ‘आबासाहेब वीर प्रेरणा पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे.
पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष असून एक्कावन्न हजार रूपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा डॉ. बाबा आढाव यांनी कष्टकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा दिला.

Related Post

error: Content is protected !!